रमाकांत आचरेकरांच्या स्मारकाचे अनावरण
विनोद कांबळी नी गाणे गाऊन वाहिली श्रद्धांजली़
मुंबई
आचरेकर सरांनी केवळ क्रिकेटचे तंत्रच शिकवले नाही, तर त्यांच्या कृतीतून इतरही सर्व गोष्टींचा बोध मिळाला. क्रिेकेट प्रॅक्सिस सोबत, नेट लावणे, विकेटला पाणी मारणे, रोलिंग करणे असे सर्वकाही करायचो. सरांनी नकळत स्ट्रीट स्मार्ट क्रिकेटपटू तयार केले. क्रिकेट खेळताना आम्हाला विकेट कशी आहे, तिचे स्वरुप कसे आहे याचे बाळकडू सरांकडून मिळाले. सरांनी बॅट, ग्लोज, पॅड जे परिधान करून क्रिकेट खेळतो त्याचा आदर करायला शिकवला. कधी राग आला तर बॅट फेकण्यापर्यंत जातो. त्यामुळे त्याचा आदर करा. अशी शिकवण आम्हाला आचरेकर सरांनी दिली. अशा आचरेकर सरांच्या अनेक आठवणींना उजाळा सचिन तेंडुलकर यांनी दिला. क्रिकेटचे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाच्या अनावरण कार्यक्रमावेळी बोलत होते.
यावेळी तेंडुलकर म्हणाले, गुरुपोर्णिमेला सरचं आम्हाला त्यांच्या घरी बोलवायचे. मटण करी, पाव, लिंबू आणि कांदे असा बेत असायचा यावर आम्ही ताव मारायचो. पोटभर भरल्यावर सरांच्या पत्नी मम्मी आम्हाला पुन्हा आग्रह करत. पण त्यांना नाही म्हणायची हिमंत न्हवती. एक वेगळंच नात होतं.
स्मारकाचे सल्लागार राज ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाच अनावरण झाले. मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये स्मारक उभारण्यात आले आहे. समारंभात विनोद कांबळीनी फक्त गाणं गाऊन आचरेकर सरांना श्रद्धांजली वाहिली. कांबळी म्हणाले, मी फार काही नाही बोलणार फक्त एक गाणं गातो. विनोद कांबळी हे आचरेकर सरांचे सर्वात लाडके शिष्य होते.
या कार्यक्रमावेळी सचिन तेंडूलकर यांनी आपले मित्र विनोद कांबळी यांची विशेष भेट घेतली. हे दोघेही मुंबईतील शारदाश्रम शाळेत रमाकांत आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवत होते. या दोघांचा कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मिडीयावर खूपच व्हायरल झाला आहे.








