सावंतवाडी / प्रतिनिधी
सिंधुदुर्गचा रहिवासी असलेला पण मुंबई येथे स्थायिक असलेल्या दयानंद तेंडोलकर याने यूपीएससी परीक्षेत उज्जवल यश संपादन केले आहे .त्याचे वडील व्यवसायाने मिल कामगार आहेत . मुंबईतील मराठी माध्यमाच्या महानगरपालिकेच्या शाळेत शिकून यूपीएससी परीक्षेत देशात 902 क्रमांकानेतो उत्तीर्ण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोघे तरुण यूपीएससी मध्ये चमकले आहेत. त्यात कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील दयानंद रमाकांत तेंडोलकर या तरुणाने यूपीएससीमध्ये आपली चमक दाखवली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. मुंबईतील शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून तो काम पाहत आहे . त्याचे वडील मुंबईतील गिरणी कामगार म्हणून सेवा बजावल्यानंतर सध्या सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथे राहतात. सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलाची या परीक्षेतील झेप नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे .









