वार्ताहर/ कुडाळ
नातवंडांचे आईच्या जिव्हाळ्याने व संस्कारांच्या शिदोरीने कौतुक करणाऱ्या दोन व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असतात. परंतू सध्याच्या इंटरनेटच्या जगात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. संयुक्त कुटुंब पद्धती उदयाला येत आहे. त्यामुळे नातवंडे आजी-आजोबांपासून दूर होत चालली आहेत. कुटुंबातील आजी-आजोबांचे स्थान जाणून आजी-आजोबा व नातवंडे यांचे नाते वृद्धिगत करण्याच्या उद्देशाने आजी- आजोबा मेळावा तेंडोली येथे आयोजित करण्यात आला होता.
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा तेंडोली भोमवाडी येथे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या उपस्थितीत आजी-आजोबा मेळावा घेण्यात आला.यावेळी मुलांचे आजी- आजोबांचे वेगवेगळे ममनोरंजक खेळ ही घेण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कौशल राऊळ . शिक्षण प्रेमी श्री. मोहन रामल, मुख्याध्यापिका सौ. योगिता पवार, उपशिक्षिका सौ. प्रज्ञा प्ररुळेकर, अंगणवाडीसेविका, मदतनीस व पालक उपस्थित होते.









