आंबोलीत शिक्षणमंत्र्यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट; शाळा बंद न करण्याचे दिले आश्वासन
वार्ताहर/ आंबोली
महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या लेखी आश्वासनानंतर शिक्षण हक्क यात्रा , ( लाँग मार्च) शाळा बचाव आंदोलन आजरा ते सावंतवाडी ही यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची घोषणा काँम्रेड नेते संपत देसाई यांनी केली. ही शिक्षण हक्क यात्रा आजरा ते शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या घरापर्यंत निघणार होती. महाराष्ट्रातील वीस पटसंख्येच्या शाळा शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात हा मोर्चा निघणार होता. शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आंबोलीत रात्रौ साडे अकरा वाजता आंदोलन कर्त्याची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शाळा बंद न करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर. मोर्चा आंबोलीतच थांबविण्यात आला.









