राजनांदगाव :
छत्तीसगडच्या डोंगरगडमध्ये बम्लेश्वरी मातेचे दर्शन करण्यासाठी हजारोंच्या संख्येत भाविक पोहोचत आहेत. याचदरम्यान शनिवारी रात्री भाविकांची गर्दी अचानक अनियंत्रित झाली. रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. उपवास, पायी प्रवास तसेच गर्दीमुळे भीती वाटू शकते, यामुळे भाविकांनी दर्शनासाठी घाई करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी केले आहे.









