उंब्रज,प्रतिनिधी
Karad News : कराड तालुक्यातील वराडे येथील डोंगरावरील दरड कोसळू लागली असून, डोंगरावरून मोठमोठे दगड व मुरूम मोठ्या प्रमाणावर निसटून मंदिराच्या पटांगणावर येऊन पडल्याचे बुधवारी सकाळी निदर्शनास आले.गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने या डोंगरावरील वरचा भाग कोसळल्याने दगड व मुरूम खाली ढासळू लागले आहेत.त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.येथे व्यायामासाठी तसेच गुरेचराईसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे गावच्या हद्दीत वराडे गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर खरजुली देवीचे मंदिर असून, या मंदीराला लागून डोंगर आहे.मागील दोन महिन्यापूर्वी या डोंगरावरील काही दगड निसटून पायथ्याला येवून पडले होते.मात्र बुधवारी २७ रोजी सकाळी मोठ्या प्रमाणावर डोंगराचा वरचा भाग निसटून मंदीर परिसरात कोसळला आहे.या डोंगरावरीलवर भाग खचू लागला आहे.यापुर्वी अनेकवेळा पावसाळ्यात मुरुम व दगड निसटून खाली पडले आहेत.मात्र बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर डोंगराचा काही भाग खाली कोसळला. त्यामुळे खरजुली देवी मंदिर परिसरातील दगड व मुरमाचा खर्च निर्माण झाला आहे.डोंगराचा वरील भाग निष्ठू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिसरात सकाळी व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनी तसेच गुरेचारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी.