नंदगड :
बाळगुंद (ता. खानापूर) येथील पुरातन बिस्टव्वादेवी मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळसारोहण नुकतेच पार पडले. या मंदिराचा जीर्णोद्धार गावच्या जिद्दी युवकांनी सर्वांच्या सहकार्याने केला आहे.
तालुक्याच्या दक्षिण टोकावर वसलेल्या या गावात सुविधांची वानवा आहे. मात्र गावकऱ्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा चंग बांधून काम पूर्ण केले. मंगळवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध देवतांचे पूजन लक्ष्मण पाटील, प्रकाश जाधव, सागर कदम, लक्ष्मण बावलेकर, रामा हुंदरे, संतोष कंग्राळकर आदींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून शिक्षक गोपाळ पाटील यांनी आभार मानले.
तत्पूर्वी गर्भगुढीचे उद्घाटन लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील यांनी केले. प्राणप्रतिष्ठा व मूर्तीपूजन पुरोहितांच्या उपस्थितीत तर कळसारोहण रयत मोर्चा कार्यदर्शी मनोहर कदम व नागरकाळी रेंज फॉरेस्ट अधिकारी महेश राठोड यांनी, दीपप्रज्वलन सुनील प्रभू, भरमाणी पाटील, शंकर पाटील, बळीराम पाटील, अशोक पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी 500 हून अधिक सुवासिनींना साडी-टोपी व मंदिराला सढळहस्ते देणगी दिलेल्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दुपारी सर्वांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.









