तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांना यश
ओटवणे प्रतिनिधी
माडखोल पावणाई मंदिर जवळ नदीपात्रात पुलालगतचे कोसळलेले पायरीचे जीर्ण झाड तीन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर हटवण्यात आले. माडखोल देवस्थानचे मानकरी दत्ताराम राऊळ आणि त्यांचे सहकारी पबी सावंत यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालताना नदीपात्रात उतरून या झाडाचे कटरच्या सहाय्याने तुकडे केले. त्यानंतर नंतर क्रेनच्या सहाय्याने हे झाड नदी पात्रातून हटवण्यात आले.
सुमारे ३० मीटर लांबीचे हे झाड पुलाच्या वरच्या बाजूने भर नदीपात्रात पडले होते. त्यामुळे परिसरात परिस्थिती ही निर्माण झाली होती. मात्र पुरस्थितीत हे झाड हटविणे अशक्य प्राय होते. परंतु दत्ताराम राऊळ आणि त्यांचे सहकारी पबी सावंत यांनी तीन दिवस स्वतःचा जीव धोक्यात नदी पात्रात उतरले. आणि कटरच्या सहाय्याने या झाडाचे तुकडे केले. त्यानंतर नदीपात्रातील हे झाड हटवण्यासाठी पप्पू शेटकर यांनी स्वतःचा जेसीबी व क्रेन उपलब्ध करून दिला.
यावेळी माडखोल उपसरपंच जीजी राऊळ, माजी सरपंच राजन राऊळ, सोसायटीचे माजी चेअरमन भाऊ कोळमेकर, शैलेश माडखोलकर, स्वप्निल राऊळ, सुयोग राऊळ, दत्ताराम राऊळ, बापू घाडी, योगेश लाड, बंटी सावंत, कैलास ठाकूर, दीपक राऊळ, न्हानू राऊळ उपस्थित होते. दरम्यान पुलालगतचे हे पायरीचे झाड पुलाच्या रेलिंग वरून पुलाखाली नदीपात्रात पडले. त्यामुळे पुलाचे रेलिंग मोडले. यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्री बामणे, उप अभियंता श्री चव्हाण, स्वप्निल सावंत श्री धरणे यांनी पुलाचे मोडलेले रेलिंग नव्याने घालून देण्याची ग्वाही दिली.









