सातारा प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील मुकदेव गावानजीक तीव्र उतारावर बुलढाणा व अकोला भागातून कामाची लोक घेऊन जाणारा 407 टेम्पोला अपघात झाला आहे. टेम्पोमध्ये एकूण 40 लोक असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. काही जखमींना तळदेव येथे तर काहींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून दोन गंभीर जखमी लहान मुलांना सातारा येथे पाठविण्यात येणार आहे.टेम्पो एका झाडात अडकल्यामुळे सर्वांचे प्राण वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.या अपघातात आर्वी चव्हाण(९ वर्षे) पिले मोहिते (वय १०) दादाराव चव्हाण (५० वय) अजय मोहिते, मंगल मोहिते(वय २२), प्रवीण मोहिते(वय ३५) ,आरोशी चव्हाण (वय २) मंदा चव्हाण (वय ६०) आरती चव्हाण (वय १७),पवन चव्हाण (वय १८), निर्जला चव्हाण (वय २०), साक्षी मोहिते (वय २२) अशी जखमींची नवे असून यात दोन गरोदर महिलांचा समावेश आहे. सह्याद्री ट्रेकर्सचे जवान संजय पार्टे दिपक जाधव गायकवाड व ग्रामस्थ मदत कार्यात सक्रीय होते.दरम्यान, अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.
Previous Articleमहापौर निवडणूक 6 फेब्रुवारीला
Next Article कॅन्टोन्मेंट नागरी वसाहत समावेशाचे मनपाला पत्र









