प्रतिनिधी,कोल्हापूर
जिल्ह्यात दोन दिवसांपुर्वी वळीवाची हजेरी लागूनही तापमानात पारा कमी होण्यापुर्वी वाढतच आहे. रविवारी दुपारी तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला. पुढील सप्ताहभर तापमानाची स्थिती अशीच राहणार आहे. उष्णतेच्या या लाटेचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. शहर आणि परिसरात पर्यटक, भाविकांच्या गर्दीत घट झाली आहे. पुढील तीन दिवस तापमानाचा पारा चाळीस अंशावर राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात शहर आणि परिसरासह काही भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात वळीवाच्या जोरदार सरी कोसळल्या. शुक्रवारी रात्री झालेल्या या पावसामुळे पहाटेपर्यत गारवा राहिला. पण शनिवारी पुन्हा दिवसभर उष्म्याचा कडाका कायम राहिला. शनिवारी पारा 38 अंश सेल्सिअसपर्यत पोहोचला होता. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच तापमान वाढू लागले. दुपारी 12 च्या सुमारास पारा 38 अंशावर होता. त्यानंतर तो 40 अंश सेल्सिअसवर पोहोचला. पण दिवसाचे सरासरी कमाल तापमान 38 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहिले.
जोतिबाच्या चैत्री यात्रेनंतर रविवारी वाडी रत्नागिरी येथील जोतिबाची दुसरी पाकाळणी रविवारी झाली. सकाळपासूनच जोतिबा डोंगरावरून अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होती. पण दुपारी ही गर्दी कमी झाली. वाढत्या तापमानामुळे पर्यटक, भाविकांची अंबाबाई मंदिरासह रंकाळा, अन्य जवळच्या पर्यटन स्थळावर गर्दी कमी असल्याचे दिसून आले. दुपारी तर रस्त्यांवरील वर्दळही कमी होती. शीतपेये, ऊसाच्या रसाला मागणी वाढली आहे.
जिल्ह्यात वाढत्या उष्म्याचा परिणाम आबालवृद्धांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. डिहायड्रेशनचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. रविवारी पारा चाळीशीवर पोहोचल्याने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवारी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस, मंगळवारी 39, बुधवारी 40 अंश सेल्सिअस राहणार आहे. गुरूवार, शुक्रवार, शनिवारी पारा 37 ते 39 अंशादरम्यान राहणार आहे. रविवारी, सोमवारी जिल्ह्यात उच्चांकी तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









