नवी दिल्ली
महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड आणि टेमासेक यांनी एकत्रित येत नुकताच एक महत्त्वाचा करार केला असून याअंतर्गत टेमासेक आगामी काळात महिंद्रात 1200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. जागतिक गुंतवणूक फर्म टेमासेक महिंद्राच्या महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडमध्ये चारचाकी इलेक्ट्रिक पॅसेंजर कारच्या प्रकल्पामध्ये वरील रक्कम गुंतवणार असल्याचे सांगितले जात आहे.









