वृत्तसंस्था / शाखापट्टणम
येथे सुरू असलेल्या 12 व्या प्रो कब•ाr लीग स्पर्धेतील सामन्यात तेलुगू टायटन्सने बंगाल वॉरियर्सचा 44-34 अशा गुणफरकाने पराभव केला. या स्पर्धेतील तेलुगू टायटन्सचा हा दुसरा विजय आहे. दुसऱ्या एका सामन्यात दबंग दिल्लीने जयपूर पिंक पॅन्थर्सचा 36-35 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव केला.
तेलुगू टायटन्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील सामन्यात विजय मलिक आणि भरत हुडा यांची तेलुगू टायटन्स संघातर्फे दर्जेदार कामगिरी झाली. या दोन्ही कब•ाrपटूंनी सुपर 10 गुण नोंदविले. तर बचावफळीची जबाबदारी सांभाळणारा अंकित पाच गुण मिळविले. बंगाल वॉरियर्सतर्फे नितीशकुमारने 5 गुण नोंदविले तर देवांग दलालने सुपर 10 गुणासह 13 गुण घेतले. प्रो कब•ाr लीग स्पर्धेच्या इतिहासामध्ये त्याने एका हंगामात आपल्या चढायांवर 50 गुण घेणारा सर्वात जलद कब•ाrपटू ठरला आहे. हा सामना सुरू झाल्यानंतर तेलुगू टायटन्सचे खाते अंकितने देवांकला बाद करुन उघडले. त्यानंतर त्याने मनप्रित, प्रदीप यांना बाद करुन आणखी दोन गुण घेतले. चेतन साहूने आपल्या चढाईवर दोन गुण मिळविले तर विजय मलिकने 10 व्या मिनिटाला बंगाल वॉरियर्सचे सर्व गडी बाद केले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत तेलुगू टायटन्सने बंगाल वॉरियर्सवर 23-14 अशा 9 गुणांची भक्कम आघाडी घेतली. तेलगु टायटन्सच्या विजय मलिकने सुपर रेडवर 10 गुण नोंदविले. तेलुगू टायटन्सने सामन्याच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ होण्यापूर्वी 13 गुणांची आघाडी मिळविली होती. विजय मलिकने आपल्या सुपर 10 गुणांवर बंगाल वॉरियर्सचे दुसऱ्यांदा सर्वगडी बाद केले. देवांक दलालने बंगाल वॉरियर्सकडून एकाकी लढत देत सुपर 10 गुण नेंदविल्याने तेलुगू टायटन्सची आघाडी थोडी कमी झाली. अखेरीस तेलुगू टायटन्सने बंगाल वॉरियर्सचा 10 गुणांच्या फरकाने पराभव केला.
दबंग दिल्ली आणि जयपूर पिंक पॅन्थर यांच्यातील सामना शेवटच्या मिनिटांपर्यंत चुरशीचा झाला. दबंग दिल्लीने जयपूर पिंक पँथर्सचा 36-35 अशा केवळ एका गुणाच्या फरकाने पराभव केला. जयपूर पिंक पँथर्सतर्फे आशू मलिकने 21 गुण नोंदविले तर जयपूर संघातर्फे नितीनकुमार आणि साहील सत्पाल यांनी सुपर 10 गुण मिळवूनही त्यांच्या संघाला थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला.









