दहशतवाद, नक्षलवाद, सायबर वॉर नंतर नार्कोटेरेरिझम यामुळे देश तसेच देशातील अनेक शहरे बरबाद होत आहेत. देशातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती बिघडवायची असेल तर सध्या नार्कोटेरेरिझमचा वापर केला जात आहे. नार्कोटेरेरिझम म्हणजे अंमली पदार्थाचा काळा व्यापार. ज्यामध्ये अबाल-वृद्धांसह संपूर्ण तरूणाईचा नाश होतो. एकप्रकारे देशाचे भवितव्य अंधारात लोटण्याचाच हा प्रकार. हाच प्रकार केला आहे तो अंमली पदार्थाच्या दुनियेतील तेलगीने.
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्कॅम 2003 ही वेबसिरीज चांगलीच गाजत आहे. 20 वर्षापूर्वी उघडकीस आलेल्या स्टॅम्प घोटाळ्यानंतर संपूर्ण देशांत एकच खळबळ माजली होती. एका साध्या बेरोजगार तरूणाने स्वत:कडे असलेले नाशवंत ब्रेन वापरीत भारत सरकारला फसविण्याचा आखलेला घातकी कट. अशी व्याख्या केली तरी वावगे ठरणार नाही. संपूर्ण देशात या घोटाळ्याची चर्चा झाली होती. कारण हा घोटाळा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला पाडलेले खिंडार होते. यामध्ये अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा समावेश होता. राजकीय तसेच पोलीस विभागदेखील या घोटाळ्यात सहभागी झाल्याचे वास्तव समोर आले होते. हा घोटाळा करणारा घोटाळेबाज म्हणजे अब्दुल करीम तेलगी हा होय. नंतर हाच घोटाळा तेलगीचा स्टॅम्प घोटाळा म्हणून आजही देशात प्रसिद्ध आहे. अगदी तशाच प्रकारचा तेलगी 20 वर्षांनी पुन्हा उदयास आला आहे. फरक एवढाच आहे की हा तेलगी अंमली पदार्थाच्या दुनियेतील आहे. ज्याने अबाल-वृद्धासह संपूर्ण तरूण पिढी नशेच्या अंमलाखाली आणण्याचा कट आखला होता. यासाठी त्याने करोडो ऊपये कमवित आणि ते इतरांना चारीत नशेचा बाजार करण्यास सुऊवात केली होती.
मात्र गुन्हेगार कितीही शातीर असला तरी एक ना एक दिवस कायद्याच्या कचाट्यात सापडतोच. अगदी त्याचप्रकारे अंमली पदार्थाच्या दुनियेतील हा तेलगी पोलिसांच्या कचाट्यात सापडला. हा तेलगी म्हणजेच ललित पाटील होय. ज्याचे संबंध राजकीय नेत्यापासून ते पोलीस तसेच विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीशी आहेत. ज्या तेलगीने स्टॅम्प घोटाळ्यासाठी नाशिकमधून प्रिंटींग मशीन तसेच इतर साहित्य गोळा करीत घोटाळा करण्यास सुऊवात केली होती. अगदी त्याचप्रकारे अंमली पदार्थाच्या दुनियेतील या तेलगीने नाशिकमधूनच ड्रग्ज बनविण्यास आणि त्याची तस्करी करण्यास सुऊवात केली. नाशिक जिल्ह्यातील शिंदे या गावात ललित पाटीलने एमडी म्हणजेच मेथेलेडॉक्सीमेथॅमॅपेटॉमाईन ड्रग्ज बनविण्यास सुऊवात केली. छोटे-मोठे काम करणाऱ्या ललित पाटीलने यापूर्वी काही केमिकल तसेच रासायनिक कंपनीत काम केले आहे. यापूर्वी म्हणजे देशात एमडी ड्रग्ज हे साधारण 2012 ते 2014 पर्यंत कायद्याच्या अंमलाखाली नसल्याने, त्याची सर्रासपणे तस्करी सुऊ होती. तसेच ते बनविलेदेखील जात होते. नेमके याच काळात ललित पाटील हा एमडी ड्रग्ज बनविण्यास शिकला होता. एमडी ड्रग्जसाठी लागणारा कच्चा माल तसेच त्याच्यावर करण्यात येणारी रासायनिक प्रक्रिया याचे पुरेपुर ज्ञान ललित पाटीलला होते.
याच ज्ञानाच्या भरावर त्याने नाशिकच्या शिंदे गावात कारखाना तयार करीत एमडी ड्रग्ज बनविण्यास सुऊवात केली. हे झाले ड्रग्ज बनविण्यापुरते. मात्र ते विकायचे कसे? ग्राहक शोधायचा कसा? यासाठी ललित पाटीलने देशातील मुख्य शहरे असलेल्या मुंबई, गोवा, दिल्ली, बंगळुऊ, चेन्नई, कोलकात्ता, कोच्ची, डेहराडून, शिमला, मनाली, चंदीगड या शहरांचा दौरा करीत या ठिकाणी अनेक तस्कर तयार केले. तर काही सराईत तस्करांच्या तो संपर्कात आला. येथूनच सुऊ झाला नशेचा काळा बाजार. या नशेत कित्येकांचे आयुष्य बरबाद झाले, कित्येक कुटुंबे रस्त्यावर आली. मात्र पैशाच्या मोहाखाली गेलेला ललित पाटील हा मढ्याच्या टाळुवरील लोणीदेखील खाण्यास तयार झाला होता. यासाठी त्याने स्वत:च्या भावालादेखील या धंद्यात ओढले. त्यानंतर त्याने मुंबई, गोवा, ठाणे, पुणे या शहरात सर्रास ड्रग्ज विक्री करण्यास सुऊवात केली. प्रत्येक महिन्याला खर्च जाऊन ललित पाटील 50 लाख ऊपये कमवित होता. यावेळी तो अनेक राजकीय नेत्यांच्या मांडीला मांडी लावून देखील बसत होता. काही दिवसापूर्वी तो मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनादेखील भेटला असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. तसेच अनेक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींशी त्याचे देणे-घेणे सुऊ होते. ललित पाटीलचे सर्व काही सुरळीत सुऊ असतानाच मुंबई पोलिसांच्या एका पथकाला नाशिक जिह्यातील शिंदे गावात ड्रग्जचा कारखाना सुऊ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, 300 कोटी ऊपयांचे ड्रग्ज जप्त केले. तर यातील सुत्रधार हा ललित पाटील असल्याचे समोर आले.
दरम्यान, पुणे पोलिसांनी ललित पाटील याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर ससून ऊग्णालयात उपचार सुऊ केले होते. मात्र आपण पूर्णत: अडकल्याची जाणीव ललित पाटीलला झाली होती. यावेळी काही मित्र आणि मैत्रीणीच्या मदतीने ललित पाटीलने येथून पळ काढला. यानंतर राजकीय वातावरण तापण्यास सुऊवात झाली. ललित पाटील नेमका कोणाचा माणूस? यावऊन आरोपांचे वार आणि प्रत्यारोपांच्या फैरी सुऊ झाल्या. तर दुसरीकडे ललित पाटीलच्या मुसक्या आवळण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले. पोलिसांनी त्यांचे सर्व खबरे सतर्क केले. तांत्रिक मदत घेत ललित पाटीलच्या हालचालीवर वॉच ठेवण्यास सुऊवात केली. अशातच तो कर्नाटकातील बंगळुऊ येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात घेऊन जात असताना त्याने ओरडून प्रसारमाध्यमाशी बोलण्याचा प्रयत्न केला. मी पळालो नव्हतो, तर मला पळविले होते. असे तो सांगत होता.
खरेच ललित पाटीलला पळविले होते? पळविले असेल तर कोणी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र याचा तपास मुंबई पोलीस करीत असून, लवकरच यामागील सुत्रधारदेखील समोर येतील. ललित पाटील हा असा मासा आहे, ज्याच्या पोटांत अनेक गुपिते लपलेली आहेत. ही गुपिते लवकरच मुंबई पोलीस बाहेर आणतील यामध्ये तिळमात्र शंका नाही.
मात्र ललित पाटीलने जे कृत्य केले आहे, ते मोक्का लावण्यासारखे कृत्य आहे. देशातील तरूण पिढी नशेच्या अंमलाखाली आणण्याचा कट आखत त्याने तो पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला आहे. देशाचे भविष्य अंधारात लोटण्याचा प्रयत्न ललित पाटील याने केला. स्टॅम्प घोटाळा दरम्यान, देशाची अर्थव्यवस्था अंधारात लोटण्याचा प्रयत्न तेलगीने केला, तोच ललित पाटीलने केला आहे. यामुळे अंमली पदार्थाच्या दुनियेतील या तेलगीला माफी नाही.
अमोल राऊत








