बांदा,दि.४(प्रतिनिधी) सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात भारत दुरसंचार निगमच्या व खासदार विनायक राऊत़ाच्या शिफारशीनुसार मोबाइल टाँवरची उभारणी केली आहे.त्यामुळे डेगवे गावात मोबाईलची काही प्रमाणात रेंज मिळत होती.परंतु सदर मोबाईलची बँटरीची अज्ञातांनी चोरी केल्यामुळे शिवाय गावातील वीजपुरवठा खंडित झाला की,कोणत्याही प्रकारची रेंज नसल्याने गावातील शाळेतील,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना,ग्रामस्थांना,ग्रामपंचायत कार्यालय,तलाठी कार्यालय,सोसायटी, शिक्षक यांना अतिशय त्रास सहन करावा लागतो.या बाबतीत संबंधित अधिकारी यांना गेली ४-५ महिन्यापासून मौखिक व लेखी निवेदने देऊनही जाणीव पुर्वक दुर्लक्ष होत आहे असे खेदजनक वाटते.त्यामुळे सदर बाबतीत पुन्हा डेगवे ग्रामपंचायतीचे सदस्य व शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री विजय देसाई व उपतालुका प्रमुख मंगलदास देसाई यांनी नुकतीच भारत दूरसंचार निगमचे उपमहाप्रबंधक रविकिरण जुन्नु यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी स्वरूपाचे निवेदन दिले आहे. त्यानी 15 दिवसात बॅटरी बसविण्याचे आश्वासन दिले. डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबईचे उपाध्यक्ष श्री तातोबा देसाई यांनी संबंधित अधिकारी व खासदार विनायक राऊत यांना अलीकडेच पत्र देऊन लक्ष वेधले आहे.
या बाबतीत सावंतवाडी तालुक्याचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री मा.ना.दीपकभाई केसरकर यांचेहि लक्ष वेधले आहे.त्यामुळे सदर बाबतीत येत्या१५ दिवसात भारत संचार निगमच्या अधिकारी यांनी कार्यवाही पुर्ण करण्यात येईल असे सांगितले आहे.अन्यथा सर्व ग्रामस्थांना एकत्र करून मोठे आंदोलन करावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे









