हैदराबाद :
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अडचणी वाडल्या आहेत. ईडीने मंगळवारी त्यांना 2015 च्या नोट फॉर वोट प्रकरणी समन्स बजावला आहे. रेवंत रेड्डी यांना 16 ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 2015 मध्ये केसीआर यांचे सरकार असताना तेव्हा तेदेप आमदार असलेले रेवंत रेड्डी हे एका आमदाराला 50 लाख रुपयांची लाचेची ऑफर देत असतानाचा व्हिडिओ समोर आला होता. रेवंत रेड्डी यांनी आदमार एल्विस स्टीफन्सन यांना रकमेची ऑफर दिली होती. याप्रकरणी रेवंत रेड्डी यांना तेलंगणा पोलिसांनी अटक देखील केली होती.









