वृत्तसंस्था / नवी दिल्ली
फ्रान्समधील मिरामेस येथे झालेल्या इलाईट इनडोअर ट्रॅक आणि फिल्ड स्पर्धेत भारताचा धावपटू तेजस शिरसेने पुरुषांच्या 60 मी. अडथळा शर्यतीमध्ये दुसरे स्थान मिळवित यापूर्वी स्वत:च नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. फ्रान्समधील या स्पर्धेत तेजसला रौप्य पदक मिळविले.
तेजस शिरसेने 7.65 सेकंदांचा अवधी घेतला. या स्पर्धेमध्ये भारताच्या ज्योती येराजीने महिलांच्या 60 मी. अडथळा शर्यतीमध्ये पाचवे स्थान मिळविताना 8.10 सेकंदाचा अवधी घेतला. 25 वर्षीय ज्योतीने 25 जानेवारी रोजी फ्रान्समध्ये झालेल्या इलाईट इनडोअर अॅथलेटिक स्पर्धेत महिलांच्या 60 मी. अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळविताना 8.04 सेकंदांचा अवधी घेतला होता.









