चालू महिन्यात ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये जॉन अब्राहमचा ‘तेहरान’ हा चित्रपट सामील आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून तो सस्पेंस आणि थ्रिलने युक्त आहे. तेहरान हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी झळकणार असून तो झी5 वर पाहता येणार आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम हा दहशतवाद्यांना भिडताना दिसून येईल. यात तो पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ‘तेहरान’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात जॉनने राजीव कुमार नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
या ट्रेलरमध्ये जॉनच्या तोडी अनेक दमदार संवाद दिसून येत आहेत. याचे दिग्दर्शन अरुण गोपालन यांनी केले आहे. तर दिनेश विजान यांची निर्मिती केली आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.









