6.78 इंच 1.5 के वक्र डिस्प्लेसह 50 एमपी कॅमेऱ्याची सुविधा मिळणार
नवी दिल्ली :
टेक कंपनी टेक्नो यांनी पोवा मालिकेतील एक नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल केला आहे. यावेळी कंपनीने टेक्नो हा जगातील सर्वात स्लिम (पातळ) 5 जी असा स्मार्टफोन असल्याचा दावा केला आहे. सदरचा फोन हा 5.95 एमएम स्लिम आहे. यात 6.78 इंचाचा 1.5 के अमोलेड डिस्प्ले राहणार आहे. ज्याचा 144 एचझेड रिफ्रेश रेट आणि 4,500 एआफटीएस पर्यंत ब्राइटनेस आहे. कॅमेऱ्यांमध्ये 50 एमपीचा प्रायमरी आणि 2 एमपीचा सेकंडरी कॅमेरा आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत 19,999 रुपये ठेवली आहे. फ्लिपकार्टवर याची विक्री 8 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
फिचर्स :
पोवा स्लिम 5 जीमध्ये टेक्नो सिग्नेचर डायनॅमिक मूड लाईट डिझाइन, सूचना आणि कॉलसाठी मागील कॅमेरा मॉड्यूलसह एलईडी लाईट्स फ्लॅशची सुविधा राहणार आहे.









