वृत्तसंस्था/ ऑकलंड
एटीपी टूरवरील शनिवारी येथे झालेल्या ऑकलंड खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत चिलीच्या अॅलेजेंद्रो तेबिलोने पुरुष एकेरीचे जेतेपद मिळवताना टेरो डॅनियलचा पराभव केला.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात तेबिलोने टेरो डॅनियलचा 6-2, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. एटीपी टूरवरील स्पर्धेतील तेबिलोचे हे पहिले विजेतेपद आहे. पुरुषांच्या मानांकनात चिलीचा तेबिलो सध्या 82 व्या स्थानावर आहे









