क्रिस हेम्सवर्थ पुन्हा दमदार भूमिकेत
लोकप्रिय हॉलिवूड चित्रपट ‘एक्स्ट्रक्शन 2’ची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. भारतात चित्रित करण्यात आलेला पहिला भाग पाहिल्यावर चाहत्यांमध्ये याच्या दुसऱया भागाबद्दल मोठी उत्सुकात आहे. अशा स्थितीत निर्मात्यांनी या चित्रपटाचा टीझर सादर केला आहे.
हा टीझर हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. 2 मिनिटे 1 सेकंदांच्या या टीझरमध्ये मार्व्हल्स चित्रपटांमध्ये ‘थॉर’ची भूमिका साकारणारा क्रिस हेम्सवर्थ पुन्हा दमदार ऍक्शन अवतारात दिसून येत आहे.

या चित्रपटाचा पहिला भाग 2020 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता आणि यात बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी अन् रणदीप हुड्डा देखील दिसून आले होते. तर दुसऱया भागात प्रियांशू पेनयुली हा भारतीय कलाकार दिसून येणार आहे. प्रियांशूने मिर्झापूर या वेबसीरिजमधील स्वतःच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
‘एक्स्ट्रक्शन 2’ हा ऍक्शन-थ्रिलर चित्रपट असून याचे दिग्दर्शन सॅम हरग्रेव्ह यांनी केले आहे. चित्रपटाची कहाणी रूसो ब्रदर्स यांची आहे. या चित्रपटात क्रिस हेम्सवर्थ याच्यासह गोल्शिफटेह फराहानी, एडम बेसा आणि डॅनियल बर्नहार्ट यांची मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.









