वेंगुर्ले (वार्ताहर)-
लेदरबॉल क्रिकेट असोसिएशन आणि गवंडे क्रिकेट ॲकॅडमी यांचे संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे २१ वर्षाखालील लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी दि. २४ ते ३० में या कालावधीत लेदरबॉल क्रिकेट संघ निवड चाचणी स्पर्धेसाठी लेदरबॉल क्रिकेट सामने आयोजित करण्यात आलेले आहे. सदर सामन्यातून लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी अंतिम चार संघाची निवड करण्यांत येणार आहे.
या लेदरबॉल क्रिकेट सामन्यात सहभागी होणाऱ्या क्रिकेटपटूंनी शनिवार दि. २० मे पर्यत जन्म दाखल्याच्या पुराव्यासह नाव नोंदणी करावयाची आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी गवंडे क्रिकेट ॲकॅडमीचे संचालक राजू गवंडे-९४०३५५७७७४ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.








