बेळगाव : प्राथमिक शाळा शिक्षिकेने रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी कुडची (ता. रायबाग) येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. अन्नपूर्णा राजू बस्सापुरे (वय 52, रा. कुडची) असे दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास कुडचीजवळ राणी चन्नम्मा रेल्वेखाली झोकून देऊन तिने आपले जीवन संपविले. घटनेची माहिती मिळताच बेळगाव रेल्वे पोलीस रात्री घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अन्नपूर्णा या कुडची येथे शिक्षिका होत्या. दोन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून मृत्यूला हेडमास्टर व एक शिक्षिका कारणीभूत असल्याचे चिठ्ठीत उल्लेख केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अन्नपूर्णा यांनी चिठ्ठीत उल्लेख केलेली नावे कोणाची आहेत? या प्रकरणात त्यांचा सहभाग काय आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. बेळगाव रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Previous Articleविकासकामाचे फलक उभारणे चुकीचेच!
Next Article उद्या काही भागात वीजपुरवठा खंडित होणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









