प्रतिनिधी /पणजी
श्री राम सेल्फ हेल्प ग्रुप तर्फे दहावीचा निकाल 100 टक्के लागल्या बद्दल महामाया उच्च माध्यमिक शाळेच्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर नवनियुक्त फलोत्पादन मंडळाचे अध्यक्ष तसेच मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट, जॉईंट मामलेदार श्रीपाद माजीक, स्थानिक सरपंच दिलीप शेट, माजी सरपंच तुळशीदास चोडणकर, महामाया स्कूलच्या मुख्याध्यापक तनुजा गोवेकर व श्री राम सेल्फ हेल्प ग्रुपच्या अध्यक्षा सुजया नाईक उपस्थित होत्या.
आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते रविदास नाईक यांचा तसेच श्रीपाद माजीक यांच्या हस्ते तनुजा गोवेकर यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षिका सुनंदा कोरगावकर, सुजल फडते, तृप्ती खोबरेकर, सुनेत्रा मोरजकर, किरण परमेकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री राम सेल्फ हेल्प ग्रुपच्या अध्यक्षा सुजया नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आमदार प्रेमेंद्र शेट याने आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक हा आजच्या समाजाचा मुख्य घटक आहे. अशा शिक्षकांचा गौरव करण्याचे आमच्या सगळय़ांचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य श्री राम सेल्फ हेल्प ग्रुप ने उत्तमरित्या पार पाडले आहे. त्यांनी भविष्यातही असेच चांगले उपक्रम राबवावेत, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम निंबाळकर तर आभार रेश्मा कुवळेकर यांनी मानले.









