सावंतवाडी | प्रतिनिधी
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उद्या पाच नोव्हेंबरला सावंतवाडी येथे राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात दुपारी दोन वाजता सर्व शाळांना संगणक किट वाटप करणार आहेत. ते उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळांना आमदार निधीतून संगणक वाटप केले जाणार आहे. तरी सर्व शाळेच्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.









