बैलहोंगल / वार्ताहर
विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन करत तिचे नग्न फोटो ठेऊन, तिच्याशी अश्लील चाळे करणार्या एका नराधम शिक्षकाला ग्रामस्थांनी धुलाई केल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील यक्कुंडी गावात सरकारी माध्यमिक शाळेत घडली.
महेश शिवलिंगप्पा बिरादार वय 44 असे विद्यार्थिनीशी गैरवर्तणुक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो विजापूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी तालुक्यातील बैरवाड गावचा रहिवासी आहे. महेश हा त्याच माध्यमिक शाळेतील एका विद्यार्थिनींशी लैंगिक चाळे करत शारीरिक संबंधही ठेवला होता असे कळते. तुझे नग्न फोटो माझ्याकडे आहेत असे सांगून तो चाळे करत होता असे ग्रामस्थांना कळताच गुरुवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेत येऊन त्याला जाब विचारला व त्याची धुलाई करण्यास सुरूवात केली.
ग्रामस्थांनी त्याच्याविरोधात सौंदत्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.