वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) पुढील महिन्यात होणाऱ्या तेलंगणा विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कौशल्य विकास घोटाळा प्रकरणी तुऊंगात असलेले पक्षाचे सुप्रीमो चंद्राबाबू नायडू यांनी हा निर्णय घेतला आहे. चंद्राबाबू अजूनही तुऊंगात असल्याने पक्षाने निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आयएएनएस या वृत्तसंस्थेनुसार चंद्राबाबूंनी टीडीपी तेलंगणा युनिटचे अध्यक्ष कासानी ज्ञानेश्वर यांना या निर्णयाची माहिती दिली. कासानी हे शनिवारी राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात चंद्राबाबूंना भेटण्यासाठी गेले होते. आंध्रप्रदेशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता पक्ष तेलंगणा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही, असे टीडीपीच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना सांगितले.









