बेंगळुरू
देशातील सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने 30 जूनला संपलेल्या तिमाहीत 9478 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. वर्षाच्या स्तरावर पाहता नफा 5.2 टक्के जास्त झाला आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत एकत्रित महसूल 16 टक्के वाढीसह 52,578 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे दिसून आले आहे.
विकासाच्या पथावर ः गोपीनाथन
टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) व व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले, की कंपनीने मागच्या तिमाहीत चांगली कामगिरी नोंदवली असून आगामी काळात विकासाला अधिक संधी आहे.









