मुंबई
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसच्या समभागाने सोमवारी शेअरबाजारात घसरण असताना 52 आठवड्यानंतर उच्चांकी स्तरावर पोहचण्यात यश मिळवलं आहे. कंपनीचा समभाग सोमवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान 1 टक्के इतका वाढत 3634 रुपयांवर पोहचला आहे. 11 ऑक्टोबरला संचालक मंडळाची बैठक होत असून त्यामध्ये शेअर बायबॅकविषयी निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वी मार्च 2022 मध्ये बायबॅकची योजना कंपनीने जारी केली होती.









