मुंबई :
भारतातील सर्वात मोठी आयटी क्षेत्रात सेवा देणारी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)ने 30 जून 2023 रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत 11,074 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो वार्षिक तुलनेत 16.83 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत फर्मने 14.8 टक्के नफा नोंदवला होता अशी माहिती कंपनीने दिली आहे.
टाटा समूहाच्या कंपनीने मागील वर्षीच्या याच कालावधीत 9,478 कोटी रुपये आणि मागील तिमाहीत 11,392 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2024 साठी महसूल वार्षिक 12.55 टक्के वाढून 59,381 कोटी झाला. कंपनीने मागील तिमाहीत 59,162 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता.
टीसीएसच्या एकूण खर्चातही गेल्या वर्षीच्या तुलनेत 5,018 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कंपनीचा एकूण खर्च एका वर्षापूर्वी 40,771 कोटी रुपयांवरून वाढून 45,789 कोटी रुपये झाला आहे. गेल्या मार्च तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 44,946 कोटी रुपये होता. कंपनीच्या पहिल्या तिमाहीतील कामगिरीबाबत, पूर्वीच्या विश्लेषकांनी जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत टीसीएस 0.8 टक्क्यांनी अनुक्रमे 59,610.4 कोटी रुपयांची महसूल वाढ नोंदवेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती.









