वृत्तसंस्था / टोरँटो
टेलर फ्रिट्झ आणि बेन शेल्टन यांनी नॅशनल बँक ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये विजय मिळवला. 15 वर्षामध्ये एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या मानांकीत फ्रिट्झने सहाव्या मानांकीत आंद्रे रुबलेव्हचा 6-3, 7-6 (4) असा पराभव केला. त्याने 20 बिनतोड सर्व्हिस केल्या.
चौथ्या मानांकीत शेल्टनने ऑस्ट्रेलियाच्या 9 व्या मानांकीत अॅलेक्स डी मिनौरचा 6-3, 6-4 असा पराभव केला. 22 वर्षीय खेळाडूने पहिल्यांदाच एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 2010 मध्ये अँडी रॉडिकने सिनसिनाटी येथे मार्डी फिशला हरवल्यानंतर फ्रिट्झ आणि शेल्टन एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारे पहिले दोन अमेरिकन खेळाडू आहेत. दुसरा उपांत्य सामना जर्मनीचा अव्वल मानांकित अलेक्झांडर व्हेरेव, रशियाचा 11 वा मानांकित करेन खचानोव्ह यांच्यात होईल. अंतिम सामना गुरुवारी आहे.









