वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन (अमेरिका)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या सिटी खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या टेलर फ्रिझने थॉमसनचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला.
शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रिझने थॉमसनचा 6-3, 6-3 अशा सरळ सेटसमध्ये पराभव करत शेवटच्या 4 खेळाडूत स्थान मिळविले. तत्पूर्वी टेलर फ्रिझने ब्रिटनच्या अँडी मरेचा 3 तासांच्या कालावधीत 6-7 (2-7), 6-3, 6-4 असा पराभव करत आपली सलग 7 सामन्यातील विजयी घोडदौड कायम राखली आहे. त्याचा उपांत्य सामना ग्रीकस्पूरशी शनिवारी उशीरा होत आहे. पावसाच्या अडथळ्यामुळे नियोजित सामने पुढे ढकलण्यात आले आहेत.









