वार्ताहर/ गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड शिवगणवाडी येथील एकनाथ पांडुरंग शिवगण (42) यांचा बोटीवर शौचास बसताना तोल जावून देवगड येथील समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिवगण हा सुमारे 5 महिन्यांपासून देवगड सुमतीनगर, ता. देवगड येथील विद्या गणपत आयएनडीएमएचपाचएमएम 2858 या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. त्याला दारूचे व्यसन होते. तसेच तो अविवाहित होता. देवगड येथील बोटमालक सुश्मिता चौगुले यांच्याकडे तो काम करीत असतानाच बुधवार 22 फेब्रुवारी रोजी बोटमालक सुश्मिता चौगुले यांचे पती सोनू चौगुलेंचा फोन एकनाथ यांचा मालगुंड येथील भाऊ संतोष शिवगण याला आला. यावेळी त्याला भाऊ एकनाथ हा बोटीवर शौचाला बसलेला असताना त्याचा तोल लावून देवगड चांभारवाडी येथे समुद्राच्या पाण्यात पडला. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ते बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याचे भाऊ व इतर कुटुंबीय देवगड येथे गेले असता त्यांनी बोटमालक व इतर लोकांच्या साथीने एकनाथ शिवगणचा समुद्राच्या पाण्यात शोध घेतला असता गुरूवार 23 फेब्dरुवारी रोजी पहाटे 5 च्या सुमारास ते समुद्राच्या पाण्यावर तरंगतांना दिसले. त्यानंतर पाण्याबाहेर काढून बाहेर आणले असता ते मृत स्थितीत आढळले. यानंतर त्यांचा मृतदेह मालगुंड येथे शिवगण कुटुंबियांनी आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास देवगड पोलीस ठाण्याच्यावतीने करण्यात येत आहे.









