दहा जण जखमी : इस्पितळात उपचार सुरू
बेळगाव : धारवाडहून बेळगावकडे टाटासुमो येत असताना के. के. कोप्पजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने टाटासुमो एका ख•dयामध्ये पलटी झाली. यामध्ये 10 जण जखमी झाले आहेत. यामधील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत टाटासुमोचे मोठे नुकसान झाले असून सुदैवानेच या अपघातातून सारे बचावले आहेत. धारवाडहून केए 22 एन 7575 ही टाटासुमो बेळगावकडे येत होती. यावेळी के. के. कोप्पजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने टाटासुमो पलटी झाली. टाटासुमोमध्ये असलेले दहा जण जखमी झाले. त्या जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले. एकाची प्रकृती गंभीर झाली होती. या सर्वांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकामध्ये घटनेची नोंद झाली आहे.









