14,523 गाड्यांची विक्री : टीयागो, नेक्सॉन, अल्ट्रोझ या मॉडेल्सनेही केली स्पर्धा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील तिसरी सर्वात मोठी चारचाकी उत्पादक कंपनी टाटा मोर्ट्स आहे. पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त, कंपनी इलेक्ट्रिक वाहन विभागातील चारचाकी वाहने बाजारात आणत आहे. कंपनीच्या वाहनांची विक्री वाढली आहे. यामध्ये आता आपण ऑगस्ट महिन्यात टाटा मोर्ट्सकडून विकल्या गेलेल्या सर्वाधिक मॉडेल्सविषयी माहिती घेणार आहोत.
पंच पहिल्या पाच स्थानी
ऑगस्टमध्ये टाटा मोटर्स कंपनीने पंच मॉडेल्सच्या सुमारे 14,523 युनिट्सची विक्री केली आहे. ऑगस्ट 2022 रोजी सुमारे 12,006 युनिट्सची विक्री केली होती.
टीयागो आणि टीयागो ईव्ही
टीयागो आणि टीयागो ईव्ही मॉडेल दुसऱ्या स्थानावर आहे. ऑगस्ट 2023 मध्ये एकूण 9,463 युनिट्सची विक्री झाली होती.
नेक्सॉन व नेक्सॉन ईव्ही तिसऱ्या स्थानी
नेक्सॉन मॉडेल तिसऱ्या स्थानी आहे. ऑगस्ट2023 मध्ये कंपनीने एकूण 8,049 युनिट्सची विक्री केली आहे.
अल्ट्रोझ
चौथ्या क्रमांकावर अल्ट्रोझ मॉडेल आहे. ऑगस्टमध्ये कंपनीने एकूण 7,825 वाहनांची विक्री केली होती.
टिगोर आणि टिगोर ईव्ही
टिगोर आणि टिगोर ईव्ही मॉडेल पाचव्या स्थानी आहे. ऑगस्टमध्ये टाटा कंपनीने एकूण 2,947 गाड्या विकल्या आहेत.
हॅरियर मॉडेल
सहाव्या क्रमांकावर हॅरियर मॉडेल आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये एकूण 1,689 युनिट्सची विक्री केली आहे.









