वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पॅकेज्ड वस्तू उत्पादक कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (टीसीपीएल) ने आगामी काळात पाच प्रमुख प्रकारात नव्याने उत्पादने लॉन्च करण्याची योजना आखली असल्याचे समजते. यामध्ये चहा, कॉफी आणि मीठ यांचा समावेश आहे.
पँट्री श्रेणीमध्ये, कंपनी कडधान्य, मसाले, मुख्य खाद्यपदार्थ, फळे आणि तयार-कुकची उत्पादने आणणार आहे. शीतपेय श्रेणीमध्ये, कंपनीने पाणी आणि पेय-रेडी विभागात नवीन उत्पादने सादर करण्याची योजना आखली आहे. नाश्त्याच्या श्रेणीमध्ये, टीसीपीएल आपल्या प्रथिन प्लॅटफॉर्मसह न्याहारी तृणधान्ये, खाण्यासाठी तयार आणि स्नॅक मार्केटमध्ये ऑफरचा विस्तार करणार आहे.
यावेळी बोलताना टीसीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कृष्णकुमार यांनी या धोरणाविषयी सांगितले की, नवे धोरण आम्हाला आमच्या ग्राहकांबद्दल धोरणात्मक समज विकसित करण्यास, आमची अंतर्गत क्षमता वाढवण्यास, नाविन्य आणण्यास, आमची एकूण उपलब्धता वाढविण्यास मदत करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. यायोगे बाजारात आपली उपस्थिती अधिकाधिक वाढवण्यासाठी कंपनी आगामी काळात प्रयत्न करेल.