ऑक्टोबरमधील विक्रीचा समावेश : अन्य वाहन कंपन्यांचीही कामगिरी सकारात्मक
नवी दिल्ली :
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सची एकूण विक्री ऑक्टोबरमध्ये वार्षिक आधारावर 5.89 टक्क्यांनी वाढून 82,954 युनिट झाली आहे. कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री ऑक्टोबर 2022 मध्ये 76,537 युनिट्सच्या तुलनेत 80,825 युनिट्सवर पोहोचली. टाटा मोटर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहन (इलेक्ट्रिक वाहनांसह) विभागातील देशांतर्गत विक्री सात टक्क्यांनी वाढली.
वार्षिक आधारावर 48,337 युनिट्स ऑक्टोबर 2022 मध्ये ते 45,217 युनिट होते. इलेक्ट्रिक वाहनांची एकूण विक्री (आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसह) ऑक्टोबरमध्ये वर्षभरात 28 टक्क्यांनी वाढून 5,465 युनिट्सवर गेली, जी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 4,277 युनिट्स होती. एकूण व्यावसायिक वाहनांची विक्री ऑक्टोबर 2022 मध्ये 32,912 युनिट्सवरून गेल्या महिन्यात चार टक्क्यांनी वाढून 34,317 युनिट्सवर पोहोचली.
टोयोटा किर्लोस्कर मोटरने दिलेल्या माहितीत ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत बाजारात विक्री 20,542 युनिट्स होती, असे म्हटले आहे तर 1,337 युनिट्सची निर्यात झाली. टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष-विक्री आणि स्ट्रॅटेजिक मार्केटिंग अतुल सूद म्हणाले की, भारतात सध्या सणासुदीच्या हंगामामुळे विक्रीत ही वाढ दिसून येत आहे.
भारतात उत्पादन क्षमता वाढीवर भर
जपानी ऑटोमोबाईल कंपनी टोयोटा मोटर कॉर्पोरेशनने भारतात उत्पादन क्षमता वाढवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. देशातील त्याचे दोन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली. येथे ‘जपान मोबिलिटी शो’ च्या निमित्ताने बोलतांना, टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे बोर्ड सदस्य आणि कार्यकारी उपाध्यक्ष योईची मियाझाकी यांनी पुष्टी केली की कंपनीने भारतातील तिच्या प्रकल्पाचा पूर्ण क्षमतेने वापर केला आहे. देशात क्षमता वाढवण्यासाठी कंपनी नवीन गुंतवणूक करणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, आम्ही त्याबाबत चर्चा सुरू केली असल्याचेही यावेळी स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. टोयोटा वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली
विक्री 66 टक्क्यांनी वाढली
जपानी ऑटोमोबाईल कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) च्या वाहनांमध्ये लोकांची आवड वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या आकडेवारीवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की ऑक्टोबर 2023 मध्ये विक्री वार्षिक आधारावर 66 टक्क्यांनी वाढून 21,879 युनिट्स झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजे ऑक्टोबर 2022 मध्ये कंपनीने 13,143 वाहने डीलर्सना पाठवली होती.









