मुंबई :
ऊर्जा क्षेत्रात कार्यरत टाटा पॉवरचे समभाग मंगळवारी तेजीत असताना दिसले. टाटा पॉवरचे समभाग बीएसईवर मंगळवारी इंट्रा डे दरम्यान 3 टक्के वाढत 243 रुपयांवर व्यवहार करत होते. अशा प्रकारे समभाग 10 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचले होते. गेल्या तीन दिवसात समभाग 10 टक्के इतका वाढला आहे. 7 सप्टेंबर 2022 रोजी टाटा पॉवरच्या समभागाने याआधी 251 रुपयांची उच्चांकी स्तर गाठला होता.









