मुंबई
: ऊर्जा क्षेत्रातील कंपनी टाटा पॉवरच्या समभागाने शेअरबाजारात शुक्रवारी 52 आठवड्यानंतर नवी उंची गाठण्यात यश मिळवलं आहे. टाटा पॉवरचा समभाग शुक्रवारी इंट्रा डे दरम्यान शेअरबाजारात 3.93 टक्के वाढत 278 रुपयांच्या स्तरावर पोहचला होता. टाटा समूहातील हा समभाग गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत 28 टक्के इतका वधारला आहे. तर गेल्या वर्षभरात पाहता हा समभाग 22 टक्के वाढला असून यावर्षीच 30 टक्के इतकी झेप समभागाने घेतली आहे.









