1613 कोटी व्यवहारातून मिळणार: कर्जाचा भार होणार कमी
नवी दिल्ली :
टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीने आपली सहकारी कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडमधील 9.9 टक्के इतका वाटा विक्री करणार असल्याची माहिती आहे. सदरच्या विक्री व्यवहारातून टाटा मोटर्सला 1613 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पुढच्या दोन आठवड्याच्या कालावधीमध्ये सदरचा विक्रीचा व्यवहार पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. टाटा मोटर्स लिमिटेडवर कर्जाचा भार हा 41 हजार 700 कोटी रुपयांचा आहे. जवळपास 23 हजार कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा टाटा मोटर्स लिमिटेड आगामी काळात कमी करणार आहे. ही कार्यवाही आर्थिक वर्ष 2025 पर्यंत चालू राहणार आहे.
टाटा टेक्नॉलॉजीजचा परिचय : टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही जागतिक पातळीवरील अभियांत्रिकी सेवा देणारी कंपनी असून जागतिक पातळीवर लागणारी डिजिटल उत्पादने कंपनी तयार करते.









