नवी दिल्ली
इलेक्ट्रीक कार्सना टायर टू व टायर थ्री शहरात मागणी वाढत असून यासाठी टाटा मोटर्स आगामी काळात विक्री वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. टायर टू व टायर थ्री शहरात विक्री केंद्रांच्या उभारणीमार्फत इलेक्ट्रीक कार्सच्या विक्रीत वाढ करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे. देशातल्या 20 शहरांव्यतिरिक्त इतर शहरातही इलेक्ट्रीक कार्सचा ग्राहकांकडून स्वीकार केला जात आहे. ही व संभाव्य मागणी पूर्ण करण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे.









