मुंबई :
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सच्या समभागाने बुधवारी शेअरबाजारात पुन्हा एकदा उच्चांकी झेप घेण्याचा पराक्रम नेंदवला आहे. कंपनीचा समभाग 3 टक्के इतका बुधवारी इंट्रा डे दरम्यान वाढत 589 रुपयांवर पोहचला होता. यांची सहकारी कंपनी जग्वार अँड लँडरोवर यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा अधिक चांगली झाल्याची बातमी असून दुसरीकडे समूहातील कंपनी टाटा टेक्नॉलॉजीसला आयपीओ सादरीकरणास मंजुरी मिळाली आहे. या 2 बातम्यांनी समभाग तेजीत राहिला होता.









