मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सचा समभाग बाजारात तेजीत असलेला दिसला. सदरचा समभाग आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला असून सदरचा समभाग गेल्या तीन आठवड्यात 20 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मंगळवारी शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान कंपनीचा समभाग 2.5 टक्के वाढत 483 रुपयांवर पोहोचला होता. जानेवारी-मार्च तिमाहीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









