किंमत 14.74 लाख रुपये : दोन स्पोक स्टीयरिंग व्हील राहणार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टाटा मोर्ट्सने आपली नवीन जनरेशन नेक्सॉन ईव्ही कारचे सादरीकरण केले आहे. यावेळी कंपनीने दावा केला आहे की, नवीन सब-4मीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही पूर्ण चार्ज केल्यानंतर 465 कि.मी. इतके अंतर धावणार आहे. ही भारतातील पहिली टू स्पोक स्टीअरिंग व्हील कार राहणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. नेक्सॉन एसयूव्हीचे बाह्या आणि अंतर्गत डिझाईन अपडेट केले आहे. या कारसोबत नवीन रंग आणि 60 हून अधिक कनेक्टिंग फिचर्स जोडली आहेत. सेगमेंटमध्ये त्याची स्पर्धा एक्सयूव्ही400 सोबत आहे. टाटाने 8 सप्टेंबर रोजी कारचे अनावरण केले आहे.
तीन ट्रिम आणि कारचे रंग
सदर कारचे बुकिंग हे 9 सप्टेंबरपासून सुरु झाले आहे. अधिकृत वेबसाईटवरुन वा डिलरशीपला भेट देत 21 हजार रुपयांच्या टोकनसह बुकिंग सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. नवीन नेक्सॉन 7 कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. तीन वेगवेगळ्या ट्रिम्समध्ये आणि विविध रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.
डिझाईन व लुक
कारचा लुक आणि डिझाईनबद्दल पाहिल्यास यामध्ये नेक्सॉन ईव्ही पेट्रोल व डिझेल मॉडेलप्रमाणेच आहे. सध्याचे नेक्सॉनचे ईव्ही मॉडेल पाहता मागील व पुढील लुक बदललेला आहे. त्यामुळे ही कार आता पूर्वीपेक्षा जादा स्पोर्टी दिसत आहे.









