मुंबई
ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सचा समभाग मंगळवारी शेअरबाजारात वेगवान दौडताना दिसला. मंगळवारी टाटा मोटर्सचा समभाग बाजारात 7 टक्के वाढत 417 रुपयांवर पोहचला होता. सोमवारी कंपनीचा समभाग 389 रुपये इतक्या भावावर बंद झाला होता. टाटा मोटर्सच्या जग्वार लँड रोवरच्या विक्रीत 15 टक्के इतकी वाढीव विक्रीची नोंद केली असल्याची माहिती आहे. या बातमीचा सकारात्मक परिणाम समभागाच्या भावावर दिसला आहे.









