मुंबई
टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशनच्या समभागाने मंगळवारी शेअर बाजारात नवा विक्रम रचला आहे. कंपनीच्या समभागाच्या भावाने मंगळवारी बीएसईवर 6 टक्के वाढत 2072 रुपयांपर्यंत मजल मारल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन आठवडय़ात या कंपनीच्या समभागाने जवळपास 29 टक्के इतकी तेजी दाखवली आहे. टाटा समूहाच्या या समभागाने या महिन्यात गुंतवणूकदारांना 39 टक्के इतका आतापर्यंत परतावा दिला आहे.









