सफारीची सुरवातीची किंमत 16.19 लाख रुपये : 16 केएमपीएल मायलेजचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटाच्या लोकप्रिय एसयूव्ही सफारी आणि हॅरियरचे नवीन पिढीतील मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. टाटा मोर्ट्सने दोन्ही एसयूव्हीमध्ये समान अद्ययावत डिझेल इंजिन दिले आहे. ज्यामुळे त्यांचे मायलेज वाढले आहे. कंपनीचा दावा आहे की, दोन्ही कार 16 केएमपीएल पेक्षा जास्त मायलेज देणार असल्याचा दावा केला आहे. दोन्ही एसयूव्हीला ग्लोबल एनसीएपीकडून 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.
या कार्सचे बुकिंग सुरु झाले असून 25,000 रुपये टोकन रक्कम भरुन खरेदीदार अधिकृत वेबसाइट आणि डिलरशीपवरुन बgिकंगची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.
टाटा हॅरियर आणि सफारीची किंमत
कंपनीने नवीन टाटा सफारी 16.19 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केली आहे. तर टाटा हॅरियरची सुरुवातीची किंमत 15.49 लाख रुपये आहे. टाटा सफारी एमजी हेक्टर प्लस, महिंद्रा एक्सयुव्ही700, महिंद्रा स्कार्पिओ आणि ह्युंडाई अल्केझारसोबत स्पर्धा करणार आहे. याचदरम्यान टाटा हॅरियरची स्पर्धा महिंद्रा एक्सयुव्ही700, एमजी हेक्टर, जीप कंपास यांच्यासोबत राहणार आहे.









