बेंगळूर
टाटा ग्रुप येत्या काळामध्ये आपल्या उत्पादन कारखान्यामध्ये 45 हजार महिलांना नोकरीमध्ये सामावून घेणार आहे. होसूर येथे कंपनीचा आयफोन संबंधित भागांची निर्मिती करणारा कारखाना आहे. याठिकाणी ऍपलकडून मोठय़ा प्रमाणात ऑर्डर वाढली असून ती पूर्ण करण्यासाठी जादा कर्मचाऱयांची गरज भासणार आहे. ही बाब लक्षात घेत आगामी काळामध्ये 45 हजार महिलांना कंपनीत सामावून घेतले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. येत्या 18 ते 24 महिन्यामध्ये ही भरती केली जाणार आहे. आतापर्यंत 10 हजार जणांची भरती करण्यात आली असून यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. 500 एकर क्षेत्रफळामध्ये उभारण्यात आलेल्या या कारखान्यामध्ये सप्टेंबरमध्ये 5000 महिलांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे.









