टाटा समूहाची मोठी घोषणा : 5.2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची गुंतवणूक करणार
मुंबई :
आपला नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी निर्मितीचा प्रकल्प ब्रिटनमध्ये उभारणार असल्याची घोषणा टाटा समूहाने केली आहे. सदरचा प्रकल्प उभा करण्यासाठी कंपनी 5.2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे.
ब्रिटनमधील नव्या कारखान्यातून इलेक्ट्रिक कार बॅटरीची निर्मिती करत भविष्यातील कार्सच्या बॅटरीची गरज पूर्ण केली जाणार आहे. ब्रिटनमध्ये होणाऱ्या या भव्य कारखान्यात सुरुवातीला 4 हजार जणांना नोकरीत सामावून घेतले जाणार असल्याची माहिती टाटाने दिली आहे. सदरचा नवा प्रकल्पाचा कारखाना इंग्लंडमध्ये नैत्येला असणाऱ्या सोमरसेट येथे होणार असल्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. जग्वार लँड रोव्हरचा कारखाना हा मध्य इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे आहे.
आमच्यासाठी ही गौरवास्पद बाब
हा प्रकल्प ब्रिटनमध्ये उभारण्यात येणार असल्याची बाब आमच्यासाठी गौरवास्पद असून ही घटना आनंददायी असल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले आहे.
ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मिळेल चालना
टाटा समूहाच्या या नवीन गीगाफॅक्टरीचे काम 2026 मध्ये सुरु होणार असून याच्या मदतीने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला सुधारणात्मक स्थितीत पहावयास मिळणार असल्याचेही सुनक यांनी स्पष्ट केले.









