ऑनलाईन टीम/तरुण भारत
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. नागपूरला होणारा C-295 लष्करी विमान वाहतुकीचा प्रकल्प आता वडोदऱ्याला होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी टाटाचा प्रकल्प नागपुरमध्ये व्हावा यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना विनंती करणारे पत्र लिहिले आहे. (tata group project should be in nagpur nitin gadkari letter to tata sons chairman tata airbus)
नितीन गडकरींनी नटराजन चंद्रशेखर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, टाटा समुहाच्या विविध उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीने नागपूरच्या मिहानमध्ये एसईझेड आणि नॉन एसईझेड अशा दोन्ही प्रकारच्या जमिनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे टाटाच्या विविध उद्योगांसाठी मोठमोठी गोदामे तयार करण्यासाठी येथे भरपूर जागा उपलब्ध आहेत. नागपूरच्या मिहानमध्ये एअर इंडियाचे विमानांसाठीचे एमआरओ असून टाटा समूह भविष्यातील व्यापार विस्ताराच्या संधीकडे पाहून मिहानमध्ये आणखी एमआरओ उभारू शकतो. तसेच स्वत:च्या एअरलाईन्ससाठी आणि इतर एअरलाईन्ससाठी स्पेअर पार्टचे मोठे गोदाम उभारू शकतो, असे नमूद केले आहे.
आपल्या एअरलाईन्ससाठी आणि इतर एअरलाईन्ससाठी स्पेअर पार्टचे मोठे गोदाम उभारू शकतो, असेही गडकरी यांनी पत्रात नमूद केले. नागपूरच्या मिहानमध्ये एअर इंडियाचे विमानांसाठीचे एमआरओ असून टाटा समूह भविष्यातील व्यापार विस्ताराच्या संधीकडे पाहून मिहानमध्ये आणखी एमआरओ उभारू शकतो.