नवी दिल्ली
कन्झुमर प्रॉडक्ट्सचा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या (2022-23) दुसऱया तिमाहीत 36.25 टक्क्यांनी वाढत 389.43 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची माहिती आहे.
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की गेल्या आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीने 285.80 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. टीसीपीएल पूर्वी टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेड म्हणून ओळखली जात होती. टीसीपीएलचे उत्पन्न गेल्या तिमाहीत 10.87 टक्क्यांनी वाढून 3,363.05 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते 3,033.12 कोटी रुपये होते.









